बसमध्ये चढतांना ५० हजारांची रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून जामनेर येथील शेतकरीजवळील ५० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, संजय प्रल्हाद पाटील (वय-४८) रा. केकत निंभोरा ता.जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांची शेती पाटबंधारे विभागात शासनाच्या ताब्यात गेल्याने त्याच्या मोबदला म्हणून त्यांच्या जळगाव शहरातील बँके खात्यात पैसे जमा झाले होते. ते काढण्यासाठी गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी जळगावात आले होते. त्यांनी खात्यातून पैसे काढले व घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जामनेर बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळील ५० हजारांची रोकड काढून चोरी केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेूवन पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ प्रतिभा पाटील करीत आहे.

Protected Content