भारत गॅसच्या ट्रकमधून १२ सिलेंडर लांबविले; अज्ञातांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । भारत गॅस एजन्सीसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी १२ सिलेंडर चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्ती पांडुरंग महाजन (वय-५३) रा. अयोध्यानगर जळगाव हे भारत गॅस एजन्सीत ट्रकचालकाचे काम करतात. ते मुंबईतील राजेश देविदास बोरसे यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक (एमएच ०४ सीपी ५५६७) वर गेल्या चार वर्षांपासून कामाला आहे. २१ मे रोजी औरंगाबाद येथून गॅस एजन्सी येथून दुपारी १२.३० वाजता ट्रकमध्ये गॅस हंडी भरून सायंकाळी ६ वाजता जळगावात दाखल झाले. जळगावातील भारत गॅस एजन्सी येथे गेटजवळ ट्रक लावून घरी गेले. दुसऱ्या दिवशी २२ मे रोजी सकाळी ८ वाजता नेहमी प्रमाणे कामावर आल्यानंतर ट्रकमधी १२ गॅस हंडी चोरीस गेल्याचे लक्षात आले. ट्रकचा मागच्या मागच्या बाजूचा लोखंडी दरवाजा अर्धवट उघडा दिसून आला. ट्रकमध्ये ३०६ हंडींपैकी १२ सिलेंडर १६ हजार ८०० कमी असल्याचे आढळून आले. निवृत्ती महाजन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय पाटील करीत आहे.

Protected Content