कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने दोन रूग्ण आढळले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरातून जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती शल्यचिकित्सक डॉ. किरण चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

 

रविवारी ६ मार्च रोजी दिवसभरात जिल्ह्यातून २ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५२७ कोरोना रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९२० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १६ बाधित रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहे. तर आतापर्यंत २ हजार ५९१ कोरोना रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी सायंकाळी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content