मुक्तळ येथील तरूण बेपत्ता; बोदवड पोलीसात हरविल्याची नोंद

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील मुक्तळ येथील २९ वर्षीय तरूण हा घरात काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

शिवाजी गोकुळे पारधी (वय-२९) रा. मुक्तळ ता. बोदवड जि.जळगाव असे हरविलेल्या तरूणाचे नाव आहे. शिवाजी गोकुळ हा ५ मार्च रोजी मध्यरात्री घरात भाऊ व कुटुंबिय सगळे झोपलेले असता शिवाजी पारधी हा घरात कुणाला काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाले आहे. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू शिवाजी पारधी हा कुठेही आढळून आलेला नाही. अखेर शिवाजी पारधी याचा भाऊ सुनिल पारधी यांनी बोदवड पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. त्यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस ठाण्यात शिवाजी पारधी हरविल्याची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content