धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; शिवसेनेची मागणी

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील. तसेच पवित्र वारकरी, तुलसी व स्वस्तिक चिन्ह  शौचालयावर रेखाटले असल्याने पालिका मुख्यधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी माहिती सावदा शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. निवेदनाची योग्य कारवाई न झाल्यास सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 

 

याबाबत माहिती अशी की,  हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याने  विटंबना होईल, याचा काळीमात्र विचार न करता नगरपालिका हद्दीतील पताळ गंगा या नैसर्गिक नाल्याच्या काठावरील महिलांसाठी उभारण्यात आलेली सार्वजनिक सौचालय वार्ड नं. ७ च्या दर्शनी भिंतवर थेट कलर पेंटिंगद्वारे बनविण्यात आलेल्या ३ चित्रांपैकी एका चित्रात “ठेवा साफसफाई घरात हेच औषध सर्व रोगात,स्वच्छ सावदा,सुंदर सावदा”या लिहिलेल्या दोन घोष वाक्यं दरम्यान ३ पुरुष सोबत एका महिलेच्या डोक्यावरील तुलसी कुंड व त्यावर पवित्र स्वस्तिक चिन्ह  वारकरी यांचे चित्र सदरील सौचालयवर दर्शवण्याचा अधर्मी प्रकार सावदा पालिकेच्या वतीने केलेला दिसून येतो.या चित्रात वारकरी सुद्धा दाखसलेले आहे.

 

वेळोवेळी पवित्र धार्मिक चिन्ह व नाव अशा चुकीच्या ठिकाणी लिहून विटंबना करून लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू  काय असा प्रश्न  नागरिकांच्या मनात येत आहे . शहराची शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे.त्यांच्याच डोळ्यासमोर सदरील अधर्मी कृत्य वारंवार होणे.हे कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे. तरी याला जबाबदार असलेले अधिकारी ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर योग्यती कायदेशीर कठोर कारवाई व्हावी. योग्य ती कार्यवाही ना झाल्यास सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवसेना उपतालुक प्रमुख धनंजय चौधरी,शहरप्रमुख सुरज परदेशी , भरत नेहते ,वेळू लोखंडे,राकेश बोराखडे, निशील लोखडे, चेतन ज्ञानदेव माळी , इरफान शेख इकबाल , हसन खान अयुब खान, भैया चौधरी, मस्तानशाहा यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content