कळमसरे येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताहास दिमाखात प्रारंभ

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे  येथे  दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच प्रमाणे आजपासून अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे दिमाखात सुरुवात करण्यात आली.

 

कळमसरे येथे दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गावातील ग्रामस्थांचे व बाहेरगावी नोकरी व व्यवसायनिमित्ताने गेलेले कर्मचारी बंधू यांचे मोठे सहकार्य यास लाभत असते असे महाराष्ट्र माळी समाजाचे माजी अध्यक्ष ह.भ.प मुरलीधर चौधरी, सतीश महारू राजपूत, सुदाम सैदाणे,विजय महाजन यांनी सांगितले. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह कळमसरे तालुका अमळनेर जिल्हा जळगांव सर्व भाविकांना कळविण्यात आनंद होतो की आमच्या येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा भगवंताच्या असीम कृपेने साधुसंतांच्या व ह .भ .प मोठे बाबा श्री 1008 ब्रह्मऋषी महामंडलेश्वर स्वामी जगन्नाथजी महाराज परमहंस, परम आदर्श आचार्य महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थजी महाराज यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी ज्ञानदानाचा लाभ घ्यावा ही विनंती आयोजकांनी केली आहे.

पहाटे पाच ते सहा काकड आरती, संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ ,रात्री साडेआठ ते साडेदहा हरिकीर्तन१५ ऑक्टोबर गजानन महाराज आमोदेकर,१६ ऑक्टोबर अंकुश महाराज मनवेलकर ,१७ ऑक्टोबर जितेंद्र महाराज विटनेरकर ,१८ आँक्टोबर ह.भ.प जितेश महाराज म्हसावदकर ,१९ ऑक्टोबर मुकेश पारगावकर ,२० ऑक्टोबर योगेश महाराज वाघाडीकर,२१ ह.भ.प देवगोपाल शास्त्री आडगावकर,२२ ऑक्टोबर देवगोपाल शास्त्रीआडगावकर धर्मप्रवक्ता यांचे काल्याचे कीर्तन सकाळी नऊ ते अकरा पालखी मिरवणूक  शुक्रवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते सात वेळेत होईल. महाप्रसाद शनिवार २२ ऑक्टोबर दुपारी बारा ते दोन वेळेत होईल तरी  कळमसरे येथील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विणेकरी निवृत्ती महाराज कळमसरे, मृदंगाचार्य हभप बजरंग महाराज, प्रवीण महाराज कळमसरे,चोपदार- ह भ प सुखदेव महाजन जितेंद्र महाजन, हरिपाठ नेतृत्व श्रीराम भजनी मंडळ मुक्ताई महिला भजनी मंडळ बाळ गोपाळ भजनी मंडळ मार्गदर्शक ह भ प रूपचंदजी महाराज औरंगपूर, भगवानजी महाराज शहापूर, सुनील महाराज कळमसरे, श्रीराम मंदिर सेवा, ह भ प रामदेवजी महाराज कळमसरे, श्री साउंड व मंडप माऊली सॉंऊड अँड मंडप डेकोरेटर्स कळमसरे ,भजनी मंडळी नित्य उपस्थिती वासेरे पाडळसरे, निम,तांदळी ,शहापूर, पाडळसरे, पढावद,मारवड,बोहरा, पाडसे स्टेशन परिसरातील भजनी मंडळे यांनी येण्याचे करावे असे व्यवस्थापक समस्त ग्रामस्थ मंडळ, श्रीराम मंदिर संस्था कळमसरे यांनी आवाहन केले आहे.

 

Protected Content