सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचा पथदर्शी उपक्रम – आ. सावकारे

वरणगाव प्रतिनिधी । कोरोना महामारी आणि चालू असलेल्या कर्फ्यूमुळे एचआयव्ही बाधित कुटुंबांसह सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले असून या कुटुंबाला जगणे कठीण झाले आहे. हे लक्षात घेऊन, ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे अशा कुटुंबाला एक महिन्याची किराणा किट देण्याचा हा एक अग्रगण्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन आ. संजय सावकारे यांनी आज केले.

आज वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाच्या प्रांगणात डॉ. नितु पाटील यांच्या पुढाकाराने ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान भुसावळ सोबत आर्थिक दात्यांच्या मदतीने तालुक्यातील एचआयव्ही संसर्गित 51 परिवाराला प्रामुख्याने संक्रमित लहान मुले आणि विधवा महिलांना मदतीचा हात म्हणुन किमान 1एक महिना  पुरेल एवढा किराणा भेट देण्यात आला. भुसावळ शहरातील नुतन आदित्य सुपर मार्ट येथील कर्मचारी वर्गाने अतिशय उत्तम प्रकारे सामान पिशवीत भरून देण्यात आले.

यावेळी डॉ. निलेश चौधरी (गिरीजा हॉस्पिटल, भुसावळ) रवी निमानी (विघ्नहर्ता पब्लिकेशन, भुसावळ) सुनील सरोदे(सुरत),नितीन चौधरी (चौधरी लॅब, वरणगाव),विनायक फालक ( आदित्य सुपर स्टोर),समीर भाऊ पाटील ,भुसावळ,विजय भंगाळे, सचिन इंगळे आदी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की,ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान मागील चार वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहितार्थ उपक्रम राबवित आहे.या करोना काळात केलेले विविध जनहितार्थ उपक्रम आणि सोशल मीडियावर जनजागृती पर लेख नक्कीच दखल घेण्यासारखे आहे. किराणा किट मध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ,चहा पावडर, साखर, शेंगदाणे,मीठ,तेल,कपडे धुण्यासाठी साबण, अंघोळीचा साबण भेट देण्यात आली.

सदर गरजू परिवारांची नावे सुनीता तायडे आणि दत्ता गुरव यांनी पाठवली तर उपक्रम यशस्वीते साठी कपिल राणे,अंकुश गवळी, दीपक फेगडे, आमीन शेख, मझर शेख, राहूल कोचुरे, प्रकाश फेगडे, भारती पाटील, ज्योती गुरव, नथु चौधरी, पूनम पाटील, साधना बडगुजर, मीनाक्षी राणे आदी यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content