बळीराजा स्वखर्चाने भागवतोय ग्रामस्थांची तहान ; सर्वत्र कौतुक (व्हिडिओ)

अमळनेर गजानन पाटील । तालुक्यातील वासरे येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर येथील शेतकरी राजेंद्र पाटील स्वत:च्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्वखर्चाने गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गेल्या २० ते २५ दिवसांपासून करीत आहेत. त्यांच्या नित्य उपक्रमामुळे गावासह परिसरातुन कौतुक होत आहे.

येथील गावात पाणी टंचाई जाणवू लागल्याने राजेंद्र पाटील यांनी कळमसरे येथील जय बाबारी भक्त परिवाराचे पाण्याचे टँकर मागवून त्याला स्वमालकीचे ट्रॅक्टर जोडून स्वताच्या मालकीची विहिरीतून गावातील प्रत्येक गल्लीत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे तात्पुरती का असेना पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याने वासरेकरांना दिलासा मिळत आहे. यामुळे राजेंद्र पाटील यांचे कौतुक होत असून दुष्काळात वासरेचा भगीरथ भागवतोय गावकरयांची तहान असेही गौरव उदगार निघत असल्याने त्यांच्यावर या नित्याच्या उपक्रमामुळे गावासह परिसरातुन कौतुकाची थाप उमटत आहे.

असा केला जातो पाणी पुरवठा

राजेंद्र पाटील यांची खेडी रस्त्यावर स्वमालकीची शेती क्षेत्रात विहीर आहे.त्यांनी शेतात बागायती क्षेत्र कमी करून गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने दररोज शेतात जाऊन स्वखर्चाने  टँकर भरून आणणे आणि गल्लीत उभे करून नळीच्या साहाय्याने प्रत्येक कुटुंबाला पिण्यासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देणे.यामुळे मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून गावातील प्रत्येक गल्लीत यथावकाश पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वत्र पाणी नसल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके कोमेजली आहेत.मात्र अशाही परिस्थितीत राजेंद्र पाटील गावात टँकरने पाणी पुरवठा करीत असल्याने त्यांच्या या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकी जोपासल्याने गावातील महिला ,ग्रामस्थ यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक ही करीत आहेत.

https://www.facebook.com/508992935887325/videos/270086987878163

 

Protected Content