निरामय सेवा फाउंडेशन व जी. एम. फाउंडेशनतर्फे आयएमएला सॅनीटायजरची मदत

जळगाव प्रतिनिधी । येथील निरामय सेवा फाऊंडेशन व जी.एम. फाऊंडेशनतर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनला ६०० लीटर सॅनिटायझरची मदत करण्यात आली.

आज या निमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात सॅनिटायझर प्रदान करण्यात आले. करोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे त्यांच्या या कार्यात हातभार लागावा म्हणून निरामय सेवा फाउंडेशन ने हा छोटासा प्रयत्न केल्याचे योगेश्‍वर गर्गे म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले गिरीश महाजन यांनी आयएमएफच्या डॉक्टरांची हितगूज करताना करोनाचा मृत्यू दर हा महाराष्ट्रात जळगाव चा सर्वाधिक असला तरी यापुढे एकही रुग्ण दगावता कामा नाही या विषयाची एक बैठक नुकतीच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये घेवुन यापुढे एकही मृत्यू होणार नाही याकरता सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

जीएम फाउंडेशन गेल्या वीस वर्षापासून जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील रुग्णांसाठी मुंबईमध्ये उपचाराची व निवासाची व्यवस्था करीत आहे सद्यस्थितीमध्ये निरामय जीएम फाउंडेशन सोबत काम करीत असताना निरामय सेवा संस्थेचे आठ पूर्णवेळ कार्यकर्ते क्षेत्रात काम करीत आहे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक शहरापर्यंत आम्ही पोहोचलेले आहे जळगाव जिल्ह्यातही निरामय सेवा फौंडेशनच्या माध्यमातून सेवाकार्य सुरू असून रुग्णांची सेवेकरिता डॉक्टर सेवेत आहेतच, आपण आपल्या सुरक्षितता कडे लक्ष ठेऊन सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी योगेशश्‍वर गर्गे यांनी केले

निरामय सेवा फाउंडेशन व जी. एम. फाऊंडेशनच्या, माध्यमातून आयएमए सभागृहात ३०० लिटर सॅनिटाजर सदस्यांना वाटप करण्यासाठी सुपूर्द केले. पुढील दोन दिवसांत अतिरिक्त तीनशे लिटर ची सोय केली जाणार आहे.एकूण ६०० लिटर्स पुरवण्यात येणार आहे.
या वेऴी रास्वसंघाचे प्रांत कार्यकारणी सदस्य योगेश्‍वर गर्गे यांनी मार्गदर्शन केले. आ गिरिश महाजन यांनीसुद्धा आयएमएच्या व खासगी डॉक्टरांच्या करोना संदर्भातील समस्या जाणून घेतल्या.

प्रास्ताविक आयएमएचे सचिव डॉ स्नेहल फेगडे यांनी केले. त्यांनी खाजगी डॉक्टरांच्या समस्या मांडल्या. सुत्र संचालन भाजपा सरचिटणीस व मा सहसचिव आयएमए जळगाव डॉ राधेशाम चौधरी यांनी केले.यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ दिपक पाटील,आमदार राजूमामा भोळे,महापौेर सौ भारतीताई सोनवणे, संघाचे विभागीय प्रचारक निलेशजी गद्रे, डॉ अनिल पाटील, डॉ विलास भोळे, डॉ धर्मेंद्र पाटील, डॉ जितेंद्र कोल्हे व आयएमए कार्यकरणीचे सर्व सदस्य, अरविंद देशमुख,डॉ रितेश पाटील व संघाचे स्वयंसेवक व संघ प्रचारक निलेश गद्रे उपस्थित होते.

Protected Content