आगामी सण-उत्सव एकोप्याने साजरे करा – पोलीस निरीक्षक श्री. नागरे

रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सर्वांनी आगामी सण-उत्सव एकोप्याने साजरे करावे कूठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. कोरोना काळातून दोन वर्षानंतर आपण बाहेर येत आहे. त्यामुळे सर्वांनी येणारे सण-उत्सव शांततेत पार पाडावे. समाजात माणुस म्हणून जगा माथी भडकव-यांची नावे पोलिस प्रशासनाला देण्याचे अवाहन पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले.

 

रावेर पोलिस स्टेशनच्या आवारात शांतता कमेटी बैठकीत संपन्न झाली. बैठकीला माजी आमदार अरुण पाटील, नगर पालिका प्रतिनिधी श्री. काळे, पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव, उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जयंती उत्सव समिती अध्यक्ष पंकज वाघ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद, कॉग्रेस शहरउपाध्यक्ष संतोष पाटील, शेख मुस्लिम पंच कमेटी गयास शेख, यूसुफ खान, असद खान, सादिक शेख रफीक भाई,आरिफ भाई, गयास काझी, धुमा तायडे, भाजपा तालुका सिटणीस उमेश महाजन, महेश तायडे, हिलाल सोनवणे, मौलाना गयासुद्दीन,मंजूर भाई, इम्रान शेख, बाळु शिरतुरे, अॅड. योगेश गजरे, कैलास तायडे,आर. आर. महाजन, भाऊलाल पहेलवान, दिलीप कांबळे, अशोक शिंदे, शैलेंद्र अग्रवाल, श्री. भोकरीकर आदी बैठकीला उपस्थित होते.

Protected Content