भारताची माहिती, तंत्रज्ञान व विज्ञान क्षेत्रातील प्रगती आश्वासक : कुलगुरू डॉ. महेश्वरी

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आपण सध्या आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. देशाने माहिती, तंत्रज्ञान, विज्ञान या क्षेत्रात परिश्रम पूर्वक प्रगती केली आहे. ही प्रगती पाहता जगात सर्वत्र भारताची प्रशंसा होत आहे असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले.

 

ते कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्था संचालित नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या एक दिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील शिक्षण तज्ञ प्रा. डॉ. एम. डी. जहागीरदार, आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर डॉ. सुजाता सिंघी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील यांच्यासह परिषदेचे संयोजक प्रा. डॉ.अविनाश बडगुजर आयोजन समिती सचिव, प्रा.भागवत पाटील, उपप्राचार्य डॉ. एन.जे. पाटील, प्रा. राजेंद्र देशमुख, प्रा.डॉ.एस. ए. गायकवाड आदी उपस्थित होते.

मानवविद्या, वाणिज्य, व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रातील अलीकडील प्रवाह’ या विषयावरील या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. माहेश्वरी पुढे म्हणाले की, परिश्रम चिकाटी या सोबतच नाविण्याकडे देखील सध्याचा तरुणाईने वळले पाहिजे. नवं ते हवं आणि कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे आपली वाटचाल असावी. कारण ज्ञान, माहिती आणि प्रगती या एकमेकांना पूरक अशा बाबी आहेत. परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीबद्दल प्रा. डॉ.एल. पी. देशमुख आणि नूतन परिवाराचे त्यांनी मनस्वी अभिनंदन केले.

यानंतर प्रमुख अतिथी डॉ. सुजाता सिंघी यांनी संगीत आणि साऊंड हे एक उत्तम औषध असून मनशांतीसाठी सृजनशीलता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अध्यक्षीय प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी महाविद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

प्रास्ताविकात संयोजक प्रा. डॉ.अविनाश बडगुजर यांनी covid-19 मुळे जगावर झालेल्या परिणाम आणि शिक्षण क्षेत्रावर झालेला प्रभाव या विषयावर विवेचन करून परिषद आयोजनाचा उद्देश कथन केला. सदर परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण २३० संशोधन निबंध ४५० सहभाग नोंदणी झाली असून याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते शोध निबंधांच्या चार खंडाचे विमोचन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अजय पाटील यांनी केले, तर आभार प्रा. कांचन धांडे यांनी केले. यानंतर प्रथम तांत्रिक सत्राचे वक्ते डॉ. एम. डी. जहागीरदार यांनी नवीन शैक्षणिक धोरण व नॅक मूल्यांकन संदर्भात महाविद्यालय व विद्यापीठे यांनी गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले. सदर सत्राचे चेअरमन म्हणून डॉ. समीर नारखेडे यांनी काम पाहिले.

द्वितीय सत्रात प्रा. डॉ. माया इंगळे यांनी जगाच्या जडणघडणीमध्ये तांत्रिक प्रवाहांचा प्रभाव या विषयावर मांडणी केली. सदर सत्राचे चेअरमन प्रा. डॉ. जे. बी. नाईक यांनी काम पाहिले. तिसऱ्या तांत्रिक सत्रात डॉ.पी एस कुलकर्णी यांनी पाणी समस्या यावर आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन या विषयावर विवेचन केले. त्यात त्यांनी पाणी आज काल आणि उद्या यावर भर दिला. या सत्रासाठी चेअरमन म्हणून अमरावती येथील आर.एम. पाटील यांनी काम पाहिले .चौथ्या तांत्रिक सत्रात शेंदुर्णी येथील प्रा. डॉ.श्याम साळुंखे यांनी वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रातील बदलते प्रवाह या विषयावर अभ्यासपूर्वक प्रतिपादन केले.यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. के व्ही पाठक होते .त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात शोधनिबंधाचे सादरीकरण करण्यात आले.तांत्रिक सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.अफाक शेख प्रा. गजाला शेख, प्रा.कांचन धांडे यांनी केले.

समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू प्रा. डॉ. एस. टी. इंगळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एल. पी. देशमुख होते. याप्रसंगी अधिसभा सभागृहात कोविड -19 नंतरच्या कालखंडात प्रत्यक्षपणे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदे बद्दल प्रा. डॉ. इंगळे यांनी कौतुक केले तर आभार प्रा.भागवत पाटील यांनी मानले. परिषद यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ. दिलीप चव्हाण प्रा.डॉ.इंदिरा पाटील,प्रा. नितीन बाविस्कर प्रा. सतीश पडलवार प्रा.डॉ. राहुल संदांशिव, प्रा. आर जी पाटील प्रा. डॉ. माधुरी पाटील यांच्यासह तासिका तत्त्वावरील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Protected Content