पाचोरा महाविद्यालयात कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांचा सत्कार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एम.एम. महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गुरूवारी १० नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन को – ऑप बँकचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपस्थित होते.

माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या शुभहस्ते कुलगुरू डॉ. एल. व्ही. माहेश्वरी यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी केले. त्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमा संदर्भात तसेच संस्थेच्या प्रगती संदर्भात आपले मत व्यक्त केले. प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. डॉ. अतुल देशमुख व डॉ.अतुल सूर्यवंशी यांनी मानपत्राचे वाचन केले.

याप्रसंगी संस्था व महाविद्यालय परिवाराच्या वतीने कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांचा मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राधेश्याम चांडक यांचा मानपत्र, शॉल व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माहेश्वरी समाज मंडळाच्या वतीने कुलगुरूंचा तसेच राधेश्याम चांडक यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या विकासाचा आढावा घेतला. तसेच नवनियुक्त कुलगुरू डॉ. एल. व्ही. माहेश्वरी यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यापीठ आपले नाव लौकिक करेल असा विश्वास व्यक्त केला. सत्काराला उत्तर देतांना कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी एकूणच उच्च शिक्षण क्षेत्राचा आढावा घेतला. तसेच नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती संदर्भात मार्गदर्शन केले. संस्था व माहेश्वरी समाजाच्या वतीने केलेल्या सत्कारा प्रति त्यांनी आभार व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव अॅड. महेश देशमुख, व्हॉईस चेअरमन विलास जोशी, कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुरेश देवरे, संस्थेचे संचालक प्रा. एस. झेड. तोतला, खलील देशमुख, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, संस्थेचे संचालक सतीश चौधरी, प्रकाश पाटील, भागचंद राका, अर्जुनदास पंजाबी, दगाजी वाघ, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सी. एन. चौधरी यांनी तर उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Protected Content