बाहेती महाविद्यालयात रंगले ऑनलाईन कविसंमेलन

जळगाव प्रतिनिधी | ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त बाहेती महाविद्यालयात ऑनलाइन कविसंमेलन संपन्न झाले.

 

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त महाविद्यालयात प्राचार्य,डॉ.अनिल लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, ऑनलाईन कथाकथन यासारखे कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झाले.  शुक्रवार, दि.२८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चा समारोप ऑनलाईन कविसंमेलनाने करण्यात आला. यात भुसावळ येथील प्रा.विनोद भालेराव, येवला येथील डॉ.धनराज धनगर आणि जळगावातील डॉ. रणजित पारधे या आमंत्रित कवींनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या. त्यास साहित्यरसिक आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. येवला येथील महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. भाऊसाहेब गमे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. मोरेश्वर सोनार यांनी तर आभार प्रा. रेणुका झांबरे यांनी मानले.

Protected Content