पीजे रेल्वे सुरू करण्याबाबत महाप्रबंधकांचे उत्तर गुलदस्त्यात! (व्हिडिओ)

पाचोरा, नंदू शेलकर | पीजे रेल्वे सुरू करण्याबाबत आपल्या निवेदनावर अभ्यास करून मगच उत्तर देण्यात येईल असे प्रतिपादन पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांनी केला. त्यामुळे त्यांचे उत्तर गुलदस्त्यातच असून पीजे रेल्वे सुरू होण्याची आशा मावळल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पाचोरा येथील रेल्वे स्थानकाची त्रैवार्षिक तपासणी करण्यासाठी आलेल्या पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांची तालुक्याचे आमदार किशोर पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पी. जे. रेल्वे बचाव कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख, ग्राहक सेवा संघाचे सरचिटणीस प्रा. डी. एफ. पाटील आदींनी भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी चर्चा करताना पी. जे. रेल्वे ही पाचोरा व जामनेर तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांची जीवनवाहिनी आहे. या गाडी द्वारे अनेक विद्यार्थी, चाकरमाने, व्यापारी, शेतकरी ये-जा करत असल्याने पी जे रेल्वे ही सर्व सामान्य जनतेची अस्तित्वाची लढाई आहे. यापूर्वी धुळे, चाळीसगाव रेल्वे ही नेरॉ गेज असतानाच ब्रॉड गेज मध्ये करण्यात आले होते. पी. जे. रेल्वेचा बोदवड पर्यंत ब्रॉड गेज करण्यास आमचा नकार नसून रेल्वेला जर नेरॉ गेज चे रूपांतर ब्रॉड गेज मध्ये करायचे असेल तर रेल्वे प्रशासनाने ब्रॉड गेज च्या कामास बोदवड पासून प्रारंभ करावा, केवळ कोविडच्या नावाखाली ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. ही बाब योग्य होणार नसल्याने रेल्वे प्रशासनाने पी. जे. गाडी पुन्हा सुरू करावी असा आग्रह उपस्थितांनी केले. दरम्यान मी तुमचे सर्वांचे निवेदने स्वीकारले असून या निवेदनाचा अभ्यास करून आपनास लेखी उत्तर देऊन महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांनी पी. जे. रेल्वे सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारचे ठोस उत्तर न देता पी. जे. रेल्वे सुरू करण्याबाबतचे उत्तर हे गुलदस्त्यातच ठेवल्याने पी. जे. रेल्वे पुन्हा सुरू होणार असल्याचे जवळपास आशा मावळल्या आहेत.

यावेळी चर्चेदरम्यान आमदार किशोर पाटील यांनी मुंबई व पूणे जाण्यासाठी पाचोरा येथून सायंकाळी ६ नंतर रेल्वे नसल्याने विविध गाड्याना थांबा मिळावा याबाबत मागणी करून भुसावळ ते रेल्वे दरम्यान तिसरी रेल्वे लाईन सुरू होणार असल्याने ही लाईन टाकण्यासाठी पाचोरा येथील मालगोदाम शेड तोडले जाणार आहे. हे मालगोदाम शेड, गिरड रोड दरम्यान हलविल्यास आम्ही नगरपालिकेतर्फे रिंग रोड तयार केला असून पाचोरा शहरातील मालगोदाम हे गिरड रोडवर हलविल्यास शहरातील रहदारी सुरळीत होणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. व रेल्वे प्लॅटफॉर्मवर पावसाळा व उन्हाळ्यात प्रवाश्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेड वाढविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी व त्यांच्या टीमने पाचोरा रेल्वे स्टेशनवरील एच. आर. एम. एस. या ऍप चे उदघाटन करून रेल्वे कॉलनी, हेल्थ युनिटचे इंस्पेक्शन, ओ. एच. ई. ऑफिस, पॅनल रूम, रेल्वे स्टेशन, रेल्वे दादरा सह रेल्वेतील विविध कक्षांचे इंस्पेक्शन केले.

*खासदार उन्मेष पाटील यांनीही निवेदनाद्वारे पी जे रेल्वे बंद करण्याबाबत दर्शविला विरोध*
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांचे स्वीय सहायक युवराज परदेशी यांच्याहस्ते महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांना निवेदन देऊन निवेदनात पाचोरा जामनेर पी. जे. गाडी बंद न करता ती पुन्हा सुरू करावी ही गाडी नवीन मार्गाच्या नावाखाली बंद करण्याचा घाट रेल्वे विभाग करीत असून याला माझा स्पष्ट विरोध आहे. यासोबतच भुसावळ नाशिक, शटल पुन्हा सुरू करावी, प्रत्येक रेल्वे स्थानकावर सिजन आणि जनरल तिकीट सुरू करावे , म्हसावद, कजगाव आणि नगरदेवळा येथे नवीन थांबे देण्यात यावे, कजगाव येथे महाराष्ट्र एक्स्प्रेस ला थांबा मिळावा, नगरदेवळा येथे हुतात्मा एक्स्प्रेसला थांबा मिळावा, पाचोरा – चाळीसगाव येथे जेष्ठ नागरिकांसाठी सरकते जिने सुरू करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मुंबई विभागाचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी, भुसावळ विभागाचे एस. डी. एम. आर. के. शर्मा, एस. डी. सी. एम. युवराज पाटील आमदार किशोर पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, माजी जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, एस. डी. पी. ओ, नरेंद्र गांगुर्डे, पाचोरा येथील स्टेशन मास्तर एस. टी. जाधव, वाणिज्य निरीक्षक चंद्रकांत कवडे, उपस्टेशन प्रबंधक जितेंद्र मोरे, अनिल प्रताप,कमराण कुरेशी,पंकज कुमार, एस. बी. पाटील, प्रिंन्सिपल चिफ सेक्यूरीटी कमिशनर अजय साधानी, डेप्युटी कमिशनर क्षितीज गुरव, असिसट्न कमिशनर डी. कुशवाह, आर. पी. एफ. पोलीस निरीक्षक सी. एस. पटेल, पी. जे. रेल्वे बचाव कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख, सदस्य पप्पू राजपूत, गणेश पाटील, अॅड. अविनाश भालेराव,भरत खंडेलवाल, प्रविण ब्राम्हणे, सुनील शिंदे, विलास जोशी, विकास वाघ, ग्राहक सेवा संघाचे सरचिटणीस प्राचार्य डी. एफ. पाटील, आर. पी. बागुल, ए. जे. महाजन, आनंद नवगीरे, राजेंद्र प्रजापत, राजस धनराळे,राजू साथी उपस्थित होते. यावेळी पी. जे. रेल्वे बचाव कृती समिती, ग्राहक सेवा संघ, प्रवासी संघटना यांनी विविध मागण्यांचे निवेदन जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी यांना दिले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/671594750944465

 

Protected Content