भाजपाचे आमदाराच्या निलंबन रद्द केल्याने जामनेरात जल्लोष (व्हिडीओ)

जामनेर प्रतिनिधी । भाजपाच्या १२ आमदाराचा निलंबन दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

 

जामनेर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील नगरपालिका चौकात फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांना महाविकास आघाडी सरकारने सत्तेच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने निलंबन केले होते. याचा खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. याचा निकाल शुक्रवार रोजी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने दिला असून भाजपाचे १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आघाडी सरकारला पुन्हा चपराक बसली, असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिका उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक बाबुराव हिवराळे, नाजिम पार्टी नाना वाणी, महेंद्र बाविस्कर, अनिस शेख, रवींद्र झाल्टे, सुहास पाटील, कैलास पालवे, विजू शिरसाट, संदीप सरताळे, धोंडू पाटील, भारत रीचवाल, निलेश चव्हाण, उदय नाईक यांच्यासह भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content