पाचोरा येथे श्रावण मासानिमित्त सामूहिक शिवतांडव स्तोत्राचे पठण

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील अखिल भारतीय ब्राम्हण महिला मंडळातर्फे श्रावण मासाचे औचित्य साधून श्रावण सोमवारी सामूहिक शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

शहरातील कृषी कॉलनी भागातील सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवारी अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळाच्या वतीने ‘शिवतांडव स्तोत्र पठण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जळगावच्या स्मिता पिले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी अपर्णा भट यांनी शंखनाद केला. तर स्नेहलता झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतांडव नृत्य हेमानी पिले, मधुरा व कोमल या मुलींनी वेशभूषेत सादर केले. तर अखिल भारतीय महिला मंडळाच्या अध्यक्षा हेमा पाटील, राधिका हस्तक, ज्योती चोबे, स्वाती कुलकर्णी, रूपाली जोशी, पूजा दीक्षित, मयुरी बिलदिकर, स्वाती जोशी, स्मिता सराफ, गौरी कुलकर्णी, कल्याणी देशपांडे, क्षमा शर्मा, राधा शर्मा, कामिनी पाठक, सुनिता तिवारी, पूजा तांबोळी, सोनाली गौड, आरती दायमा, पूजा तळेगावकर, मधुरा पाठक, गौरी भट, तृप्ती नाईक, माहेश्वरी रावल, दीपा जोशी, अर्पिता शर्मा, किर्ती दीक्षित, प्रिति पापरीकर, शर्वरी तांबोळी, कोमल जोशी, तेजस्विनी, मंजुषा जोशी आदी महिला मंडळाच्या सदस्यांनी सामूहिक शिवतांडव स्तोत्राचे पठण केले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. हळदी कुंकू व महाप्रसाद वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी बिल्दीकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कल्याणी देशपांडे यांनी मानले.

Protected Content