शहरात कोरोना लसीकरणाचे तिसरे केंद्र कार्यान्वित !

 

जळगाव, प्रतिनिधी शहरात नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी दोन खाजगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सोमवारी ऑर्किड हॉस्पिटलमध्ये तिसरे केंद्र महापौर सौ.भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. 

जळगाव शहरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना लस देण्याचे काम सुरू आहे. शहरातील गोल्ड सिटी हॉस्पिटल, गाजरे हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर सोमवारी ऑर्किड हॉस्पिटलमध्ये तिसरे केंद्र कार्यान्वित करण्यात आले. महापौर सौ.भारती सोनवणे व आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ.सोनल कुलकर्णी, ऑर्किड हॉस्पिटलचे डॉ.परेश दोशी, डॉ.प्रीती दोशी, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पवन गोंधळीकर, डॉ.उदयसिंग पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content