डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आरक्षण जाहीर

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार ग्रामपंचातीच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. तीन प्रभागासाठी तीन सदस्य असे एकुण ९ जागांसाठी ही निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भरत पारधी यांनी दिली.

 

धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतीसाठी ९ ग्रामपंचायत सदस्यांना निवडून द्यायचे आहे. त्यानंतर आरक्षणानंतर लोकनियुक्त सरपंचपदाची देखील निवड करण्यात येणार आहे. त्यापुर्वी ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांची संख्या २ हजार १४६ असून पुढील निवडणूक कशी असणार आहे याबाबत शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ग्रामसभा घेवून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ही निवडणूक २०११ च्या जनगणनाच्या निकषानुसार होणार असल्याने उपस्थित नागरीकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. निवडणूकीत मतदारांची संख्या वाढविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही, असा आरोप काही ग्रामस्थांनी केला. याप्रसंगी तलाठी विनोद पाटील, कोतवाल तरबेज खाटीक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content