सलून दुकानदार व कारागीर यांना शिवसेना पक्षाकडून सुरक्षात्मक किटचे वाटप

 

धरणगाव, प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडून व शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या प्रयत्नाने धरणगाव शहर सलून दुकानदार यांना आज कटिंगसाठी लागणारे अप्रोन व दाढीसाठी लागणारे नॅपकिनचे वाटप ना. गुलाबराव पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उप नगराध्यक्ष कल्पना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना सारख्या महाभयंकर आजाराची नाभिक बांधवांना लागण होऊ नये,व ग्राहकांना सुद्धा सुरक्षा राहील या उद्देशाने आज हे साहित्य वाटप करण्यात आले. या संगी नामदार गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, गेले ३ महिन्यापासून नाभिक बांधवांचे दुकाने बंद हो. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.व शासनाने आता सलून दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिल्यावर नाभिक बांधव लगेच सुरक्षित साधनांवर खर्च करू शकत नाही म्हणून त्यांना आता कुठलाच कोरोनाचा त्रास होऊ नये म्हणून हे साहित्य देण्यात येत आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की,गेल्या ३ महिन्यापासून नाभिक समाज बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन प्रशासनाला सहकार्य केले. त्यांनी बंदच्या काळात दुकाने बंद ठेऊन प्रशासनास खूपच चांगले सहकार्य केले. कुठलाही प्रसंग आला तर शिवसेना नेहमी नाभिक समाजाच्या पाठीशी उभी राहील असे आश्वासन सुद्धा श्री. वाघ यांनी दिले..याप्रसंगी मा.नगराध्यक्ष पी. .एम.पाटील यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक नाभिक समाज अध्यक्ष सतिष बोरसे यांनी केले तर आभार नाभिक महा मंडळाच्या महिला प्रदेश अधक्ष्या भारती सोनवणे यांनी फोनवरून आभार मानले .या कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक पप्पू भावे, वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, जीतू न्हाळडे, भानुदास विसावे, अहेमद पठाण, सुरेश महाजन, विजय महाजन, विलास महाजन, बापू पारेराव, नंदू पाटील, किरण मराठे, अजय चौहान, बाळू जाधव, धिरेंद्र पुरभे, किरण अग्निहोत्री, रवी जाधव, वाल्मिक पाटील, मच्छिंद्र पाटील यांच्या सह नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोरसे, महेश निकम, कमलेश बोरसे, गोपाळ फुलपगार, रवी निकम, प्रशांत फुलपगार, मोहन फुलपगार, हेमंत फुलपगार, चंद्रकांत फुलपगार, रमण बोरसे, राजेंद्र फुलपगार, दिगम्बर निकम, गणेश झुंजारराव, दिलीप गायकवाड, बापू झुंजारराव, सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content