‘त्या’ बाधिताच्या संपर्कातील १६ जणांचे संस्थात्मक विलगीकरण

पहूर, ता. जामनेर, प्रतिनिधी । येथील विद्यूत मंडळाच्या १३२ केव्ही पॉवर हाऊस येथे टेक्नीशियन म्हणून सेवेत असणाऱ्या ४२ वर्षीय कोरोना योद्ध्याचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या १६ जणांचे आज पहूर ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेण्यात आले आहेत.

पॉवर हाऊसमध्ये कार्यरत बाधित कोरोना योध्दा मनेर येथे वाकी रस्त्यावर हरी ओम नगर येथील रहीवासी असल्याचे समजते . ते पहूर येथील १३२ केव्ही पॉवर हाऊस मध्ये सेवेत आहेत काल सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील १६ जणांना आज दुपारी पहूर येथील आर .टी .लेले हायस्कूलमध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे .

Protected Content