धरणगावात ९ ते ५ वाजेपर्यंत दुकाने उघडे राहणार

धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. या काळात शहरातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे देशात ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा लक्षात घेता शहरातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे. आदेशाचे पालन न करणारे व लॉकडाऊनच्या नियमांचे भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक देसले यांनी दिली आहे.

Protected Content