जळगावातील महिलेवर परराज्यात अत्याचार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणारी २९ वर्षीय महिलेला परराज्यात घेवून जावून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील २९ वर्षीय महिला ही जळगाव शहरातील एका भागात वास्तव्याला आहे. तिचे पतीसोबत कौटुंबिक वाद असल्याने ती औरंगाबाद येथून जळगाव शहरात रहायला आली होती. महिलेची राजेश कुमार जयनारायण पासवान रा. संतौर, सहरसा नारायणपूर, बिहार यांच्याशी ओळख निर्माण झाली. राजेशकुमार याने महिलेशी जवळीक साधत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान बिहार राज्यात त्याच्या गावाला घेवून गेला. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. कुणालाही सांगून नको अशी धमकी दिली. महिला जळगावात आल्यानंतर बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून दुपारी २ वाजता संशयित आरोपी राजेशकुमार जयनारायण पासवान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.

Protected Content