जळगावात दोन दुकाने फोडली;दीड लाखाचा ऐवज लंपास

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नवीपेठ भागातील एक ज्वेलरी शॉप व बाजूचे फर्निशिंगचे दुकान काल रात्री (दि.१४) 3.०० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडून एक लाख ५५ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आज शहर पोलिसात दुपारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चोरी झालेल्या ठिकाणापासुन हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे, तरी चोरट्यानी येथे हात साफ केल्याने पोलिसांचा धाक संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नवीपेठ भागात लक्ष्मी ज्वेलरी शॉप आहे, यात दागिने घडविण्याचे काम करण्यात येते. या दुकानाचा कडी तोडून आत प्रवेश करून ३० हजार रुपयांचे सोने चोरले मात्र लॉकर न उघडल्याने त्यातील सामान चोरते नेऊ शकले नाहीत. याच दुकानाशेजारी इंडिया फर्निशिंगचे शोरूम आहे, या दुकानाचे शटर कुलूप तोडून व काचेची भींत यामधील सहा इंच गॅपमधुन आत प्रवेश करून दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली एक लाख २५ हजारांची लाखांची कॅशही चोरट्यांनी लंपास केली आहे. याभागात रात्री गस्त घालत असलेला वॉचमन दुकानाजवळ आला असता त्याला लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने लागलीच मालक लालचंद रुंगठा यांच्या घरी जाऊन माहिती दिली. त्याणे चोरट्यांचा पाठलाग सुध्दा केला, मात्र चोर पसार होण्यात यशस्वी झाले. इंडिया फर्निशिंगच्या दुकानातील सी. सी. टी. व्ही. कॅमेर्यामध्ये चोर स्पष्ट दिसत आहेत.

 

Add Comment

Protected Content