नंददीप माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


अमळनेर (प्रतिनिधी) सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे, स्पर्धेत टिकायचं असेल तर स्पर्धा परीक्षांवर भर द्या, भरपूर मेहनत करा व यशस्वी व्हा असे मत येथील नंद दीप माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात संस्थेचे चेअरमन अँड. राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हे सर, अॅड. विवेकानंद चौधरी, अॅड. संभाजी पाटील, नंदलाल सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक ए.बी. चौधरी उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

दहावीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. शाळेचे उपशिक्षक व सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे माजी संचालक ए.पी. चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक एस.एच. सुतार, व्हि.एच.चौधरी, एम.एस.चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील शिंगाणे, व्हि.एम. चौधरी, आय. बी. चौधरी, विलास पाटील, भोलेनाथ चौधरी यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन ए. जी. पाटील यांनी केले तर आभार ए.पी चव्हाण यांनी मानले.

Add Comment

Protected Content