कॉफी पुरविणाऱ्या टवाळखोरांवर कासोदा पोलिसांनी केली कारवाई

कासोदा प्रतिनिधी। कासोद गावातील शाळांमध्ये दहावीचा पेपर सुरू असताना बाहेरून कॉफी पुरविणाऱ्यांनी धुमाकूळ घातल्याने वर्गातील विद्यार्थी अस्वस्थ झालेले दिसून येत होते. यावर आळा घालण्यासाठी कासोदा पोलीस प्रशासनास यश आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता १०ची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. कासोदा केंद्रात साधना माध्यमिक विद्यालय, हाजी एन.एम. सय्यद उर्दु हायस्कूल  , शहजादि  उर्दु हायस्कूल येथे एसएससीची बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येत आहे.

या परीक्षेचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर असुन
पहिल्याच दिवशी कॉफीचा सुळसुळाट झालेला दिसून येत होता.

परीक्षा केंद्रावर अजब प्रकार घडल्याने एकच  खळबळ उडाली परीक्षा सुरू असताना परीक्षेदरम्यान तिघीही केंद्रांवर पोलिसांनी बाहेरून कॉफी पुरविणाऱ्या काही टवाळखोर कॉफी बहाद्दर ताब्यात घेऊन अद्दल घडवत , कासोदा पोलिसांनी मुबंई पोलीस अधिनियम कलम १२० ( ब ) प्रमाणे कार्यवाही केली असून , त्यांच्या पालकांना बोलवून तिकीद देऊन  व नोटीस देत पालकांच्या स्वाक्षरीने सोडण्यात आले.

पोलिसांचा दणका
तसेच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे  श केंद्र संचालक जि. के.सावंत यांनी नोटीस काढत परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्राच्या गावातील संपुर्ण झेरॉक्स दुकान पेपर असल्याच्या दिवशी व पेपर होई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु कासोद्यातील दुकान धारकांनी थेट जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून कासोद्यात बहुतांश ठिकाणी झेरॉक्स दुकान सुरू असून जादा पैसे घेऊन झेरॉक्स काढत असल्याचे दिसून आले. कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांनी कारवाई करत झेरॉक्स मशीन जमा करून घेत, नोटीस बजावत असल्याचे सांगितले.

Protected Content