पीएसआयवर हल्ला प्रकरणातील आरोपी निखील राजपूतला अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गस्तीवर असणार्‍या पोलीस उपनिरिक्षकावर हल्ला केल्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी निखील राजपूत याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, २७ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री श्रीराम नगराजवळील हनुमान मंदिराजवळ टोळक्याने फौजदारावर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी उपनिरीक्षक महेश धायतड यांच्या फिर्यादीनुसार निखिल राजपूतसह गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, अक्षय न्हावकर उर्फ थापा, नीलेश ठाकूर व अन्य एका अनोळखी अशा ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वच्या सर्व संशयित फरार झाले होते. त्यातील चेतन संतोष पाटील (वय २९), नीलेश चंद्रकांत ठाकूर (२१), ओमकार उर्फ गोलू विठ्ठल कोल्हे (२२) व आकाश गणेश पाटील (२३, सर्व रा.श्रीरामनगर, भुसावळ) या चौघांना वांजोळारोड परिसरातून अटक करण्यात आली होती. तर या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निखील राजपूत हा मात्र अद्यापही फरार होता.

या पार्श्‍वभूमिवर, निखील राजपूत याला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Protected Content