पातोंडा जि.प.शाळेत “शाळा पूर्व तयारी” सोहळा उत्साहात

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची व मुलींच्या शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.

दोन्ही शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी पालक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवीका यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्येची माता सरस्वती व शिक्षणाच्या चळवळीच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.तद्नंतर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश करतांना विद्यार्थ्यांनी फीत कापून प्रवेश केला. नविन विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी ह्या हेतूने विविध खेळांचे उपक्रम राबविण्यात आले होते. शाळेच्या पहिल्याच दिवसांत विद्यार्थ्यांना विविध उपक्रम व मनोरंजनात्मक दृश्यांच्या अनुभवाची प्रचिती आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

यावेळी बॉईज शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक बिरारी, सदस्य भाऊसाहेब पाटील, किशोर मोरे, सागर मोरे, गजानन पारधी, पी.टी. पवार, भुरा संदानशिव, रेखा पाटील, अशोक पाटील, अशोक ढीवरे, सरला पाटील, उषा पवार, अलकनंदा पवार, सुनीता बैसाणे, मुख्याध्यापिका सरला बाविस्कर, शिक्षिका विजया पाटील, शिक्षक राजेंद्र पाटील, किशोर पाटील आदीसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार शिक्षक कमलेश मोरे यांनी केले.

 

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!