तिरुवनंतपूरम विमानतळावर ८.५ कोटींची सोन्याची बिस्कीटे जप्त

73476529 73476527

तिरुवनंतपूरम (वृत्तसंस्था) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भारतीय प्रवाशाकडून एकूण २५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत ८.५ कोटी रुपये असून यापूर्वी या विमान तळावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने कधीच जप्त करण्यात आले नव्हते, असे महसूल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

एक प्रवासी मोठ्या प्रमाणावर सोने घेऊन येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून येथील महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) देण्यात आली होती. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचला होता. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या सामानाची तपासणी करण्यात येत असतानाच एका प्रवाश्याच्या सामानात ही सोन्याची बिस्कीटे आढळली. या सोन्याची एकूण किंमत साडेआठ करोड रूपये इतकी आहे. या प्रवाशाचे नाव सुनील असे असून तो तिरुमलाचा रहिवासी आहे. मस्कतवरून ओमान एअरलाईनच्या डब्ल्यूवाय-२११ या विमानाने ते सकाळी साधारण ७.३० वाजता तिरुवनंतपूरम विमानतळावर पोहोचला होता.
तपासादरम्यान सुनीलजवळ दोन बॅगा सापडल्या. या बॅगेत अॅल्युमिनियम फॉईलची दोन पाकिटे सापडली. ही पाकिटे उघडून पाहिल्यावर त्यात सोन्याची २५ बिस्कीटे सापडली. हे प्रत्येक बिस्कीट एक किलो वजनाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सगळी बिस्कीते जप्त करण्यात आली आहेत. विमानात नेण्यासाठी जितके वजन नेण्याची परवानगी असते, त्यापेक्षा जास्त वजन नेत असतानाही सुनीलला अडवण्यात कसे आले नाही ? याचा तपासही करण्यात येत आहे.

Add Comment

Protected Content