नवीदिल्ली, वृत्तसंस्था | अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चीट देण्यात आल्याचे वृत्त निराधार असल्याचे अँटी करप्शन ब्युरोने नुकतेच स्पष्ट केले आहे.
अँटी करप्शन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्याविरुध्द सुमारे ३००० केसेस मध्ये चौकशी सुरु आहे. त्यापैकी बऱ्याच केसेसमध्ये गुन्हे दाखल झाले असून चौकशी सुरु आहे. त्यातील चौकशी झालेल्या नऊ प्रकरणात प्रथमदर्शनी अजित पवार यांचा सहभाग आढळून आलेला नाही, एवढाच फक्त विषय आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकरणात त्यांना अद्याप क्लीन चीट देण्यात आलेली नाही, असेही अँटी करप्शन ब्युरोने स्पष्ट केले आहे.