घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करा : मनसेची मागणी

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे लवकर वर्ग करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा येईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष (जनहीत) चेतन अढळकर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, यावल शहरातील प्रत्येकाला हक्काचे घरकुल देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र या हक्काच्या घरकुलांना निधीचा ब्रेक लागला आहे. योजनेच्या खात्यावर पैसेच नसल्याने लाभार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनुदानाअभावी कामाच्या ऐन घाईत घरांचे बांधकाम नागरिकांना बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना पैशासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. पात्र लाभार्थ्यांना सुरूवातीला पहिला हप्ता दिला जातो. त्यानंतर घर बांधणीचे ठराविक टप्पे पुर्ण होतील तसे ज्या-त्या टप्प्यानुसार पुढील हप्ते बँक खात्यावर जमा केले जातात. घर बांधणीसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे पडले. त्यामुळे लाभार्थी स्वतःहून काही रक्कम घालून घरकुल उभारणीचे काम सुरू करतात. मात्र शासनाकडून नियमित मिळणाऱ्या हप्त्यांना निधीचा ब्रेक लागला आहे. शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यावरच निधी जमा केलेला नाही परिणामी लाभार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. तरी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहीत कक्षाच्या माध्यमातून सांगत आहोत तातडीने निधी उपलब्ध करण्यासाठी आपण जे काही शासन दरबारी पाठपुरावा करायचा तो करा येत्या आठ दिवसात ह्या योजनेचे पैसे जमा न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन किंवा नागरिकांना लाभार्थ्यांना घेऊन उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, मनोज माहेश्री, विद्यार्थी सेना गौरव कोळी, महाराष्ट्र सैनिक अजय तायडे, आबिद कच्छी आदी उपस्थित होते.

 

Protected Content