विद्यापीठामध्ये शासनाच्या जीआरला केराची टोपली : अॅड. कुणाल पवार यांचा आरोप

 

जळगाव, प्रतिनिधी । शासनाच्या जीआरनुसार कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्या विभागातील सेवा ज्येष्ठ व्यक्तीकडे सोपवणे आवश्यक होते, परंतु विद्यापीठात शासनाचे या जीआर ला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस सचिव अॅड. कुणाल पवार यांनी केला आहे. 

अॅड. कुणाल पवार यांनी पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारचे पायमल्ली ही यापूर्वीही वित्त व लेखाधिकारी या पदासाठी सुध्दा बी. बी. पाटील व त्यानंतर प्रा. काटदरे याच्या नियुक्ती ने करण्यात आली होती.  विद्यापीठात वेळोवेळी नॉन टीचिंग  मधील अधिकाऱ्यांना सक्षम, पात्र असून सुध्दा कमी लेखन्यात येत आहे व टीचिंगमधील प्राध्यापकांनाच संधी दिली जात आहे. नियमानुसार आता देखील नियुक्ती होतां दिसत नाही म्हणून एकंदरीत आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो असच दिसत आहे.  विद्यापीतठात विद्यार्थी संघटना विद्यापीठाच्या हितासाठी व विद्यार्थी वर्गाच्या हितासाठी आंदोलन करत आहेत. त्यातच कमी ते काय प्रा. ए. बी. चौधरी ह्यांच्या वर देखील संशोधन चौऱ्याची महिती संकेत स्थळांना उपलब्ध असताना अजून किती दिवस आपल्या विद्यापीठाची बदनामी ही मंडळी करणार आहेत याबाबत शंका उपस्थित होत आहे. मावळते कुलगुरू इथ उपस्थित राहून काही मूठ भर लोकांच्या दबावाखाली काम करत होते. परंतु हे कुलगुरू तर नाशिकला असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात एक दोन व्यक्ती बिले काढण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे तसे नसेल तर विद्यापीठाच्यावतीने तसे जाहीर करण्यात यावे असे आव्हान अॅड. कुणाल पवार यांनी दिले आहे. 

 

 

Protected Content