आमदार चिमणराव पाटलांचे शुभेच्छा फलक फाडले 

एरंडोल-रतीलाल पाटील | एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडल्याने स्थानिक पदाधिकारी संभ्रमात असतांनाच एरंडोल येथे आमदार चिमणराव पाटील यांनी नूतन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी लावलेले फलक फाडण्यात आल्याने खळबळ उडालेली आहे.

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडवणीस यांच्या निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्याबाबतचे येथे ठिकठिकाणी मोक्याच्या जागांवर मंगळवारी बॅनर्स लावले होते. मात्र आज आमदार चिमणराव पाटील व पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती अमोल चिमणराव पाटील या दोघांचे बॅनर्स वरील फोटोचा भाग पाडण्यात आला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर थोड्या वेळानंतर हे बॅनर्स काढून टाकण्यात आले आहेत.

जिल्हा शिवसेनेत देखील उभी फूट पडण्याचे चिन्ह असले तरी अनेक ठिकाणी अंतर्गत कलह असल्याने याच वादातून आमदार आणि त्यांच्या पुत्रांच्या शुभेच्छांचा फलक फाडण्यात आल्याचे मानले जात आहे. शहराच्या राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा सुरू आहे.

Protected Content