नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे गट पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटानं आक्षेप घेतला आहे. या विरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं या याचिकेची दखल घेतली आहे. त्यामुळं हा खेळ अद्याप संपलेला नाही.
राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेप्रकरणी दिलेल्या निकालादिवशीच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत हे सांगितलं होत की, नार्वेकरांचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचा अवमान करणारा आहे. त्यामुळं आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ पण स्वतः कोर्टानच जर या निकालाची दखल घेऊन सुओमोटो दाखल करुन घ्यावी. अपेक्षेप्रमाणं कोर्टानं या निकालाची दाखल न घेतल्यानं अखेर ठाकरे गटानंच याचिका दाखल केली आहे. साम टीव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.

शनिवार रविवार सुट्टी असल्यानं दोन तीन दिवसांपासून याचिका दाखल करण्यात आली नव्हती. पण आज सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन स्वरुपात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं देखील या याचिकेची नोंद घेतली आहे.
ठाकरे गटाच्या याचिकेची सुप्रीम कोर्टानं नोंद घेतली असून याचा सुनावणीच्या यादीत समावेश देखील करण्यात आला आहे. पण याचिका कधी सुनावणीसाठी कोर्टासमोर येईल, हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. पण याचिकेवर लोकसभा निवडणुकीच्या आधी सुनावणी घेऊन निकाल दिला जावा अशी मागणीही ठाकरेंनी यापूर्वीच केली होती. त्यामुळं आता कोर्ट याचिका कधी सुनावणीसाठी घेतं हे महत्वाचं असणार आहे.

Protected Content