असोदा रेल्वेगेट ते प्रजापत नगर रस्ता होणार!

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील असोदा रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असून नागरिकांना महाराष्ट्र रेल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करून दिला जाणार आहे. महापौर सौ.भारती सोनवणे व आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी रस्त्याची पाहणी केली. 

असोदा रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम लवकरच सुरू होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे आवश्यक आहे. रेल्वे रुळाला लागूनच असलेल्या रस्त्यावर पुढे काही इमारती असल्याने तूर्तास त्याठिकाणी सरळ आणि विस्तीर्ण रस्ता तयार करणे शक्य नाही. नागरिकांना वाहतुकीसाठी महाराष्ट्र रेल्वे इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून असोदा रेल्वे गेट ते सुनंदिनी पार्कपर्यंत ६ मीटरचा रस्ता करून दिला जाणार आहे. 

सध्या त्याठिकाणी असलेल्या कच्च्या रस्त्याची महापौर सौ. भारती सोनवणे, आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, एमआरआयडीसीचे व्यवस्थापक, अभियंता, मक्तेदार प्रतिनिधी बाला खटोड आदी उपस्थित होते. सध्या असलेला रस्ता पूर्णतः कच्चा असून रस्त्याची मोजणी मनपाच्या नगररचना विभागाकडून करण्यात आलेली आहे. महापौर, आयुक्तांनी रस्त्याची पाहणी करून पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना केल्या.

 

 

Protected Content