शहरातील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये संगीत नाटकाचे सादरीकरण

जळगाव प्रतिनिधी । येथील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये पंडित भातखंडे आणि पंडित पलुस्कर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. हे सादरीकरण ऑनलाईन युट्युब व फेसबुक च्या माध्यमातून सादरीकरण झाले

यामध्ये ययाती – अनिरुद्ध डावरे, देवयानि – मंजुषा भिडे, शर्मिष्ठा – मृण्मयी कुलकर्णी, संन्यासी – सोहम वाणी, कचदेव – तन्मय सागडे यांनी भूमिका साकारल्या तर स्वरमयी देशमुख हिने तम निशेचा सरला,समृद्धी वाणी हिने यती मन मम, तर स्वानंद देशमुख यांनी हे सुरांनो चंद्र व्हा व प्रेमा वरदान ही नाट्यगीते सादर केली तर त्यांना साथ संगत स्वाती देशमुख गणेश देसले हार्मोनियम, रवींद्र भोईटे स्वानंद देशमुख ( तबला ) यांनी केली.

तसेच मी मानापमान व सर्वात्मका सर्वेश्वरा या नाट्य गीतांवर मृण्मयी कुलकर्णी आणि साक्षी माळी यांनी कथक नृत्य सादर केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य अमित सिंह भाटीया, समन्वयिका संगीता तळेले, स्वाती अहिरराव, अनघा सागडे, जेष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक योगेश पाटील, संतोष शिरसाळे, रवींद्र भोईटे, जयेश देशमुख, भारती माळी, नरेंद्र भोई या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Protected Content