कोहिनूर मिल प्रकरण: आरोप झाल्यास नरेंद्र मोदी, अमित शाह यांचीही चौकशी झाली पाहिजे : संजय राऊत

AAB0cBn

 

मुंबई (वृत्तसंस्था) उद्या जर नरेंद्र मोदी किंवा अमित शहांवर आरोप झाले. तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आल्याबाबत आपल्याला काही खास वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

 

आपल्या तपास यंत्रणांवर चांगले संस्कार आहेत. उद्या माझ्यावर असे काही आरोप झाले, तर माझीही चौकशी झाली पाहिजे नरेंद्र मोदींचीही चौकशी झाली पाहिजे, अमित शाह, राहुल गांधी किंवा सोनिया गांधी कोणीही असो सर्वांची चौकशी झाली पाहिजे”, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे या कारवाईकडे राजकीय दृष्टीने पाहणे आणि बोलणे योग्य नाही. जर उद्या मी काही चुकीचे केल नसेल तर सिद्ध करु शकतो. पुराव्याला देशात अजूनही स्थान असून लोकशाही जिवंत आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Protected Content