महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेतर्फे सावता महाराज यांना अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी । महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था, अयोध्यानगर या संस्थेतर्फे  श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिमापूजन व माल्यार्पण तुळशीराम वारुळे व अनुसयाबाई यांचे हस्ते संपन्न झाले.

 

प्रसंगी  उद्योजक संतोष इंगळे व महात्मा फुले विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नंदू पाटील यांनी संत सावता महाराज यांच्या चरित्राविषयी माहिती दिली. तसेच, संत चरित्र अंगीकारावे. त्याचा अभ्यास करावा. त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करावा असे सांगितले. प्रसंगी वामन महाजन, जयंत इंगळे, संजय माळी, हेमंत महाजन, महेश महाजन, राजू तायडे, हर्षल इंगळे, दिनेश माळी, गोपाळ महाजन आदी समाज बांधव उपस्थित होते.

 

Protected Content