२१ फेब्रुवारी पासून राज्य नाट्य स्पर्धा सुरु होणार – अमित देशमुख

मुंबई,लाईव्ह ट्रेंड्स न्यूजवृत्तसेवा । राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणारी राज्य नाट्य स्पर्धा, २१ फेब्रुवारी २०२२ पासून राज्यातील १९ केंद्रांवर सुरू होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज केली.

 

ओमायक्रॉन आणि कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, १५ जानेवारीपासून सुरू होणारी राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलली गेली होती. सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरुवात २१ फेब्रुवारी पासून, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धा ५ मार्चपासून तर बालनाट्य स्पर्धा १० मार्च आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या निमित्ताने सहभागी स्पर्धक संघ व कलाकारांचे अभिनंदन करून सर्व सहभागी संघांनी कोवीड-19 विषाणू प्रादूर्भाव संदर्भात शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन स्पर्धेतील प्रयोगाचे सादरीकरण करावे असे आवाहन त्यांनी केले आहे

Protected Content