चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी सारखी धाडसी चोरीचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील अनेक गावात आणि शेतात मागील काही दिवसा पासुन गावात व शहरात घरफोडीचे तसेच शेतातील शेतकऱ्यांची विद्युत केबल चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढ झालेली आहे. शेती साहीत्य चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांना थांबविण्याचे असेल तर यावल पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याकामी तसेच चोरट्यांना लगेच तात्काळ चौकशी करून अटक करावी अशी मागणी आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट कोरपावली तालुका यावल सरपंच विलास अडकमोल, काँग्रेस रावेर लोकसभा क्षेत्र अध्यक्ष सद्दाम शाह , ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांनी भेट घेऊन केली आहे. दरम्यान या सर्व घडामोडी विषयी पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंडे यांना सदरची माहिती दिली . सदर भेटीत स्थानिक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातुन लवकरात लवकर चौकशीचे आदेश देऊन अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांना थांबवुन, तात्काळ चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ . प्रविण मुंढे यांनी संबंधित पोलीस निरीक्षक यांना देण्याचे आश्वासन दिले तसेच जिल्ह्यात चोऱ्या व घरफोडया रोखण्यासाठी ग्रामसुरक्षादल रात्रीची गस्त म्हणून स्थापन करण्याची संकल्पना पूर्वपदावर असल्याचे सदरच्या भेटीत पोलीस अधिक्षक डॉ . मुंढे यांनी आश्वाशीत केले.

Protected Content