रस्त्यांचे काँक्रीटीकरण करा; भाजपचे निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धनगरवाडा परिसरात रस्ते व्यवस्थित नसल्याने नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे असे निवेदन भाजपाच्या वतीने यावल मुख्याधिकारी मनोज म्हसे यांना देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील ठेंगे सोसायटी ते धनगरवाडा उर्वरीत भाग व धनगरवाडयातुन मोठया मारोती कडे जाणारा रस्ता हा बऱ्याच वर्षांपासुन रस्ता काँन्क्रीटीकरण आणि गटारीवरील ढाप्याचे अद्याप झाले नसल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या पादचारी व नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत स्थानिक रहिवाशी यांनी समस्या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या. परंतू प्रश्नाकडे प्रशासन गांर्भीयांने लक्ष देत नाही. परिसरात रस्ते व गटारींवर ढापे नसल्याकारणाने लहान मुले या गटारीत पडून दुखापत होत आहे. तर दुचाकी व लहान वाहने उघडयावर असलेल्या गटारीमध्ये पडत असल्याचे प्रकार घडत आहे .                   नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या रस्त्यांच्या व उघडयावर असलेल्या गटारीचे ढाप्यांची कामे त्वरीत करावी अशी मागणी केली. विविध मागण्यांचे निवेदन भाजपाचे शाखा अध्यक्ष ललीत परमार्थी यांच्यासह अन्य उपस्थित होते.

 

Protected Content