नशिराबाद शहर विठ्ठलाच्या नामाने भक्तिमय

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभुषा परिधान करून हातात टाळ, मृदंग, झांज व लेझीम पथकांनी संपूर्ण नशिराबाद शहर विठ्ठलाच्या नामाने भक्तिमय केले.

 

आयोजित दिंडी सोहळ्यात विद्यार्थांनी सजीव आरास सादर केली. त्यात विठ्ठलाच्या वेशभूषेत चंद्रकांत सावकारे व मंदार वाणी, रुक्मिणी पूर्वा चौधरी व स्वरा चौधरी यांनी केली. संत तुकाराम – आदित्य ढेंगले, संत एकनाथ – जीत पाटील, संत ज्ञानेश्वर – भावेश काळे व दर्शन पाटील, संत नामदेव – ईशान भरत, संत सावता – भूमीत पाटील तर संत नरहरी सोनार – साई सोमवंशी इत्यादी विद्यार्थांनी वेशभूषा सादर केल्या. या सोहळ्यास सर्व पालकांनी ठीक –  ठीक रांगोळी काढून पूजन करून पालखीचे स्वागत केले. या पालखी सोहळ्यास प्रारंभ विठ्ठल मंदिरापासून करण्यात येऊन इंदिरा चौक – शिवाजी चौक – राम पेठ – स्वातंत्र्य चौक मार्गे पुन्हा विठ्ठल मंदिराजवळ सांगता करण्यात आली.

 

दिंडी सोहळा यशस्वितेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अध्यक्ष जनार्दन माळी, उप कार्याध्यक्ष प्रमिला महाजन, संचालक राजू पाटील, विनायक वाणी, सुनिता पाटील, मुख्याध्यापक सी.बी. अहिरे, प्रविण महाजन, पर्यवेक्षक बी.आर. खंडारे, पूजा पज्ञटील, अनिल चौधरी, राजेंद्र पाचपांडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content