Home क्राईम चोपडा शहरातून एकाची दुचाकी लांबविली; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

चोपडा शहरातून एकाची दुचाकी लांबविली; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

two wheelar thift

चोपडा प्रतिनिधी । चोपडा शहरातील सुदर्शन कॉलनी परिसरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची चोरी केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, अरूण बळीरात पाटील (वय-६२) रा. सुदर्शन कॉलनी चोपडा हे खासगी व्यवसाय करतात. कामासाठी त्यांच्याकडे होन्डा डिलक्स (एमएच १९ डब्ल्यू ४३१२) क्रमांकाची दुचाकी आहे. १७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कामावरून घरी आल्यावर घरासमोर दुचाकी पार्किंगला लावली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुचाकी लंपास केल्याची घटना दुसऱ्या दिवशी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. नातेवाईक व मित्रांकडे तपास केला असता दुचाकी मिळून आली नाही. अखेर १ डिसेंबर रोजी चोपडा शहर पोलीसात धाव घेवून दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. अरूण पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. योगेश पावले करीत आहे.


Protected Content

Play sound