अंबिलहोल ग्राम कृषी समितीचा शेडनेट हाऊस पाहणी अभ्यास दौरा (व्हिडिओ)

जामनेर, भानुदास चव्हाण | तालुक्यातील आंबिलहोल येथील ग्राम कृषी समितीचा नानाजी देशमुख पोखरा योजनेअंतर्गत हिवरखेडा येथील शेतकरी हेमंत पाटील यांच्या शेतातील शेडनेट पाहणी व अभ्यास दौरा संपन्न झाला.

 

ग्राम कृषी समिती अध्यक्ष योगिता नाईक, कृषी सहाय्यक शरद सुरडकर, समूह सहाय्यक रुपेश बिराडे, समिती सदस्य भानुदास चव्हाण, बाळू चव्हाण, दिलसिंग चव्हाण, सखुबाई पवार, संगीता जाधव, कल्पना चव्हाण, शेतकरी हेमंत पाटील, विजय पाटील, अशोक सोनवणे, आनंदा पाटील आदी शेतकरी दौऱ्यादरम्यान उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना शेडनेट हाऊस च्या माध्यमातून कमी जमीन व खर्चात जास्त उत्पन्न कसे घ्यावे याची माहिती देण्यात आली.  यावेळी  शेडनेट हाऊस उभारणीसाठी एकरी २८ लाख रुपये खर्च येतो त्यापैकी शासनाच्या पोखरा योजनेच्या माध्यमातून ७५ टक्के सबसिडी दिली जात आहे. त्यामुळे या शेडनेट हाऊसच्या माध्यमातून फळभाज्या व फुलशेती घेऊन वर्षाला तीन वेळा उत्पन्न घेता येत असून याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून शेडनेट हाऊस उभारणी करून अधिक नफा घेण्यासाठी करावी असे आवाहन या वेळी कृषी सहाय्यक यांनी केले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1229237514248742

Protected Content