पिंपळगाव (हरेश्वर ) ग्राम विकास मंडळाच्या १५ जागांसाठी उद्या मतदान

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   तालुक्यातील प्रशिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव (हरेश्र्वर) येथील ग्राम विकास मंडळाची त्रेवार्षिक निवडणूक उद्या रविवारी दि. १६ रोजी  सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत १५ जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे.

 

गेल्या दोन वर्षांपासून वादग्रस्त ठरलेल्या या मंडळाची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील हे काम पाहणार आहेत. मतदान संपल्यानंतर काही वेळात मतमोजणीला सुरवात केली जाणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून मंडळाची सत्ता ग्राम विकास पॅनलकडे आहे. या निवडणुकीत दोन पॅनल मधे सरळ लढत असली तरी अध्यक्षपदासाठी एक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी ग्राम विकास मंडळ पॅनलतर्फे प्रकाश बाजीराव पाटील, विकास पॅनलतर्फे विद्यमान अध्यक्ष देविदास रामदास महाजन तर अपक्ष म्हणून किशोर भिकन गरुड हे आपले नशीब आजमवित आहेत. ग्राम विकास बचाव पॅनलतर्फे चिटणीस पदासाठी सुखदेव विठ्ठल गिते, आश्रयदाते भास्कर धनजी पाटील, अनुसूचित जाती पदासाठी दिपक हरसिंग सोनवणे, भटक्या विमुक्त जमाती पदासाठी भाईदास त्रंबक चव्हाण, महिला राखीव पदासाठी गयाबाई नामदेव मालकर, हितचिंतक पदासाठी विलास मधूकर गरुड, कडुबा भालचंद्र तेली, दिलीप फुलचंद जैन, जनार्दन ओंकार देव, हंसराज गबरु पवार, अशोक दत्तू पाटील, प्रदिप रघुनाथ बडगुजर, सुरेश काशिनाथ बडगुजर, दालीमखा आलिमखा, तर विकास पॅनल तर्फे चिटणीस पदासाठी मौजूलाल राजूलाल जैन, आश्रयदाते यशवंत भास्कर पाटील, अनुसूचित जाती पदासाठी विजय शांताराम सावळे, विमुक्त जाती जमाती पदासाठी रंगलाल गोविंदा राठोड, महिला राखीव पदासाठी संगिता मनोज बडगुजर, हितचिंतक पदासाठी खुर्शीद अली मोहम्मद अली, रविंद्र श्रीपद जाधव, शांतीलाल गेंदिदाल तेली, मिलिंद दत्तात्रय देव, रविंद्र गोविंदसिंग देशमुख, प्रदिप वामन पवार, अशोक कृष्णराव पाटील, रमेश हरी पवार सुकलाल गणपत राठोड याप्रमाणे एकास एक उमेदवार आहेत.

 

Protected Content