कोटेचा महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालय, येथे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रंथालय समितीचे प्रमुख डॉ.जे. व्ही. धनवीज, महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल एस. एस. पाटील, प्रमुख वक्ते प्रा. विनोद भालेराव, ग्रंथालय समिती सदस्य डॉ. आर एस गजरे व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी एन.एस.एस. डॉ. एस.के. अग्रवाल आणि प्रा. निता चोरडिया आदी  उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यापर्ण करून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. विनोद भालेराव यांनी “वाचन संस्कृती व आजचा विद्यार्थी” यावर व्याख्यान करताना प्रतिपादन केले की, आपली आई हे आपले पहिले पुस्तक असते. बाळाला ती आपल्या स्पर्शाने… आवाजाने घडवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनींनी पुस्तके वाचली पाहिजे व त्यातून भारताचा सुजाण नागरिक जन्मास येईल. पुस्तकांमुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. जीवन जगण्यास पुस्तके प्रेरित करीत असतात. सर्व देशातील विद्वान जरी वेगवेगळ्या जातीचे धर्माचे असले तरी ते ज्ञानाने सर्वांच्या परिचयाचे होतात. पुस्तकातून मिळालेल्या ज्ञानाने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होते. विद्यार्थिनींनी जर आपले व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर पुस्तके वाचायला वाचलीच पाहिजे. डॉ. कलामांनी पाहिलेले स्वप्न व्हिजन 20-20 साकार करायचे असेल, तर युवकांनी पुस्तकांच्या प्रेमात पडायला हवे. यातूनच देशाचा विकास होईल.  डॉ. कलाम विद्यार्थ्यांना म्हणतात “Low Aim is a Crime”  त्यामुळे मोठी स्वप्न पहा व आपली प्रगती करा. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात -” जर आपल्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाचे पुस्तक घ्या व एक कृपया भाकरीसाठी खर्च करा”. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी युवक युवतीने आणि देशातील नागरिकांनी आपल्याला जे जे वाचता येईल ते वाचायला हवे.  या महापुरुषांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असायला हवे.

कार्यक्रमाचे अध्यक्षांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना म्हटले की, परिस्थितीचे भांडवल करू नका. यश संपादन करायचे असेल तर पुस्तकांसारखा सर्वात जवळचा मित्र नाही. भारतातील सर्व महापुरुषांचा आदर्श नजरेसमोर ठेवून विद्यार्थिनींनी आपले निश्चित ध्येय गाठावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल श्री एस. एस. पाटील यांनी केले सूत्रसंचालन व आभार डॉ.आर .एस गजरे यांनी मानले. या कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य यांनी मार्गदर्शन केले व तसेच  कार्यक्रमाच्या यशस्वतीसाठी विलास सरोदे, रामदास तायडे, आदींनी सहकार्य केले.

 

Protected Content