निंदकाला धन्यवाद द्यावेत : हभप बाळकृष्ण महाराज

मुक्ताईनगर प्रतिनिधी | निंदकामुळे आपल्याला आपले आत्मपरीक्षण येते त्यामुळे निंदकाला धन्यवाद द्यावेत असे प्रतिपादन कोथळी येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताहात हभप बाळकृष्ण महाराज यांनी केले.

आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त सनातन सतपंथ संप्रदाय द्वारा आयोजित श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताह सुरु आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा करताना बाळकृष्ण महाराज यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून श्रोत्यांचे मन जिंकून घेतले. त्यांनी सांगितले की मनुष्याचे शरीर वेगळे असले तरी आपल्यातील आत्मा एकच आहे. सौंदर्य, ज्ञान, प्रतिष्ठा, सत्ता टिकवण्यासाठी तपश्चर्या आवश्यक असून संतांच्या चरणस्पर्शाने परमेश्वराची प्रसन्नता होते. आपली निंदा करणाऱ्यांना धन्यवाद द्यावेत कारण त्यामुळे आपल्यातील दोष काय आहे ते आपणास कळते असा मौलिक उपदेश त्यांनी दिला.

आपण सर्व एकच असून सर्वांमध्ये एकच आत्मा विराजमान असल्याने सर्वांकडे आत्मभावाने बघा असे प्रसिध्द किर्तनकार हभप बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांनी श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताहाच्या किर्तन सोहळ्यात सांगितले. सप्ताहासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती धर्म मंडपात होती. संप्रदाय समाज वेगळे असले तरी आधी आम्ही भारतीय आहोत. त्यासाठी समस्त संप्रदायांनी एकत्रित येणे हाच खरा परमार्थ असल्याचे या कथेचे आयोजक महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!