पंकज बालसंस्कार केंद्रात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चोपडा येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज बालसंस्कार केंद्रात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.

 

पंकज बालसंस्कार केंद्रात वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून डॉ. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र आपणास किती प्रेरणादायी आहे, वाचनाने विचार क्षमता वाढते, वाचनाने माणुस समृद्ध, ज्ञानी, प्रगल्भ होतो याची माहिती यावेळी देण्यात आली.  जिवन चरित्राचे वाचन विभाग प्रमुख रेखा पाटील यांनी केले. तर स्वामी विवेकानंदांच्या छान छान गोष्टींचे वाचन जयश्री हिंगे यांनी केले. यासाठी मिना माळी, भावना दिक्षीत, छाया बारी, योगिता कोळी, अनिता बऱ्हाटे, सुनंदा विसावे या सर्व शिक्षिकांनी उत्साहाने भाग घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Protected Content