भारतीय जनता पक्षाच्या यावल शहर सरचिटणीसपदी गोविंद बारी

यावल प्रतिनिधी । येथील संभाजी पेठेतील बारी समाजाचे कार्यकर्ते गोविंद बारी यांची भारतीय जनता पक्षाच्या यावल शहराच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने धनश्री चित्रपटगृहाच्या सभागृहात आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांच्या हस्ते आणी रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे , जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौ. रंजनाताई प्रल्हाद पाटील , तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी , नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित गोविंद मधुकर बारी यांना पक्षाच्या सरचिटणीसपदावर निवड करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले . गोवींद बारी यांच्या यावल शहर सराचिटणीसपदी निवडी झाल्याबद्दल विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले .

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!