घरफोडी करणारा एलसीबीच्या ताब्यात

पारोळा प्रतिनिधी | लॉंड्रीच्या दुकानात काम करून रात्री घरफोडी करणार्‍या एकाला एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्याने दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, पारोळा पोलीस स्थानकात गुरनं १९५/२०२१ भादंवि कलम ४५७,४५४,३८० तसेच गुरनं ३१४/२०२१ अन्वये दाखल भादवि कलम ४५७,३८० या दोन गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या मार्फत सुरू होता. या अनुषंगाने सुनिल दामोदरे, पोह जयंत चौधरी, पोह दिपक पाटील, पोना प्रमोद लाडवंजारी, पोना नंदलालपाटील, पोना किरण धनगर, पोना भगवान पाटील, पोकॉ सचिन महाजन, चालक पोह दिपक चौधरी, पोना अशोक पाटीलअश्यांचे पथक स्थापन करण्यात आले होते.

सदरचे पथक हे सुमारे एक महिन्या पासून पारोळा तालुक्यात शोध घेत होते. दरम्यान, एलसीबीचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार बकाले यांना गुप्ता माहिती मिळाली. यानुसार पंचायत समिती पारोळा चे बाजुला असलेली रुद्र लॉड्री मध्ये कपडे प्रेस करणारा कपील दिलीप वाघ, (रा.पेंढारपुरा पारोळा ) हा गावात प्रेस करीता कपडे ने आण करीत असतांना घराची पाहणी करुन बंद घर रात्रीच्या वेळी फोडुन घरफोडी करीत होता. तसेच घरफोडीत मिळालेल्या रक्कमेवर मौज मस्ती करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून पारोळा मध्ये कपील दिलीप वाघ, रा.पेंढारपुरा पारोळा याला अटक करण्यात आली आहे. त्याने पारोळा शहरात दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

 

Protected Content