अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या

 

 

धर्मशाला : वृत्तसंस्था । अभिनेते आसिफ बसरा यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. आसिफ यांनी हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाला येथे गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी मॅक्लोडगंज येथील जोगिबाडा रोड स्थित एका कॅफेच्या शेजारी आत्महत्या केली.

आसिफ यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस सध्या तपास करत आहेत. पोलिसांना तपासात मिळालेल्या माहितीनुसार आसिफ हे आपल्या परदेशी मैत्रिणीसोबत धर्मशाला येथे एका भाड्याच्या घरात राहत होते.

असं सांगितलं जात आहे की गुरुवारी दुपारी आसिफ आपल्या पाळीव कुत्र्यावर फिरायला घेऊन गेले होते. कुत्र्याला फिरवून आणल्यानंतर ते घरी परतले आणि नंतर त्याच पट्ट्याला लटकून त्यांनी गळफास लावून घेतला. सुरुवातीच्या तपासात ही आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे.

Protected Content